breaking-newsमुंबई

सीएसएमटी-घाटकोपर दोन जादा फेऱ्या

मुंबई – मध्य रेल्वेवर ३१ डिसेंबरपासून सीएसएमटी-घाटकोपर-सीएसएमटी अशा दोन लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यात दोन कुर्ला फेऱ्यांचा विस्तार केल्याने घाटकोपर फेऱ्यांची संख्या चारवरून सहावर पोहोचली आहे.

घाटकोपर-अंधेरी-वसरेवा अशी मेट्रो सेवा आहे. घाटकोपर स्थानकात उतरून सीएसएमटीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे येथे बरीच गर्दी होते. ही समस्या सोडवण्यासाठीच आणखी दोन घाटकोपर लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएसएमटीहून नवीन फेरी सकाळी ९.५७ वाजता सुरू होईल, ती लोकल घाटकोपर स्थानकात सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल. दुसरी फेरी घाटकोपर स्थानकातून १०.३५ वाजता सुरू होईल आणि ती लोकल सीएसएमटीला ११.१२ वाजता पोहोचेल. दोन्ही लोकल फेऱ्या रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मात्र बंद राहतील.

अन्य फेऱ्यांच्या वेळेत बदल

* सकाळी ९.५३ची सीएसएमटी-कल्याण लोकल कल्याणला ११.२४ वाजता पोहोचेल. सकाळी १०.०२ची सीएसएमटी-कल्याण ११.३२ वाजता कल्याणला पोहोचेल.

* १०.०६ ची सीएसएमटी-ठाणे सकाळी ११.०४ला ठाण्याला पोहोचेल. सकाळी १०.१० वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल ११.०८ वाजता, १०.१४ वाजता सुटणारी सीएसएमटी-कल्याण ११.४५ वाजता कल्याणला पोहोचेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button