breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मस्ती की पाठशाळेला’ वोक्सवँगन कंपनीने दिला प्रकाश

  • रावेत येथील बांधकाम मजूर वस्तीवरील शाळेला वीज प्रवाह

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सहगामी फाऊंडेशन व राॅबिन हूड आर्मीच्या तर्फे रावेत येथे बांधकाम मजुर वस्तीवरील मुलांसाठी  “मस्ती की पाठशाळा” विजेची समस्या जाणवत होती. त्या शाळेला वोक्सवॅंगन कंपनी प्राॅंडक्शन टिमकडून 3 केव्ही सोलर पॅनेल दान करण्यात आले.

वोक्सवँगन कंपनीच्या प्राँडक्शन टिमच्या वतीने सामाजिक उपक्रम फ़ंडातून 3 केव्हीचा सोलर पॅनेल दान देण्यात आला. यावेळी डॉ. हेराल्ड मंझेंरिएडर,मिसेस झिंगझिंग,सई संगवाई,रवी नायडू,केदार आपटीकर,अविनाश गोसावी,मृदुल श्रीवास्तव,समीर मुनोत,दिलीप कातकर, अजय कवाडे तर सहगामी च्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू,रोशनी राय,ज्ञानेश्वर भंडारे,अन्वर मुलाणी,गार्गी नाटेकर,राँबिनहुडचे रवी जयस्वाल,अदिती चव्हाण,लोकेश ढुबंरे,झील पटेल आदी उपस्थित होते.

डॉ. हेराल्ड म्हणाले की, उज्वल देशाचे भविष्य हे मुलांच्या हाती असते. ही पिढी घडविण्यात आमचा वाटा होत आहे. यात आम्ही समाधानी आहोत. रवी नायडू यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी वोक्सवँगन कंपनीचे व इतर मान्यवर दात्याचे अन्वर मुलाणी यांनी आभार मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button