breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांचीही साक्ष नोंदवण्यात येणार…

कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडं करण्यात आली होती.

अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडं केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडं केला होता. त्यानंतर आयोगानं यावर शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयोगाचे अध्यक्ष न्या. जे.एन. पटेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. “कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येईल. त्यांना साक्षीसाठी बोलवण्यात येईल,” पटेल म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button