breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्त.. ठेकेदारांचा ‘मोरक्या’, विरोधकांना भाजप नेत्यांकडे जाण्याचा दिला सल्ला

शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांचा गंभीर आरोप

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त हे सत्ताधारी भाजपच्या हाताखालचे कळसुत्री बाहूले बनले आहे. महापालिकेतील निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी तुम्ही सत्ताधारी भाजप आमदार, महापाैरांना भेटण्याचा सल्ला देवू लागले आहेत. तसेच आयुक्त हे महापालिकेचे आहेत की भारतीय जनता पार्टीचे हे नेमकं कळायला मार्ग नाही. परंतू, ठेकेदारांना पोसण्यासाठी आयु्क्त सोयीस्कर भूमिका घेत दोन हजार कुटूंबे उद्धवस्त करायला निघाले आहेत. त्यामुळे आयुक्त… ठेकेदारांचे ‘मोरक्या’ असल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी शिवसेना गटनेते राहूल कलाटे, शहर स्वयंरोजगार सेवा सह संस्थाचे फेडरेशनचे प्रल्हाद कांबळे, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. शहरातील दैनंदिन रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाची निविदा रद्द करावी, अशी अशी मागणी शहर स्वयंरोजगार सेवा सह संस्थाचे फेडरेशनने पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली.

उबाळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरातील 6,12 आणि 18 मीटरचे रस्ते सोडून मुख्य व अन्य रस्ते साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यात यावी, शहरातील 6,12 व 18 मीटर रस्त्यांची दैनंदिन साफसफाई स्वयंरोजगार संस्था फेडरेशनकडून करण्यात यावी. त्यासाठी त्या कामाची निविदा रद्द करा, असे आमचे म्हणणे आहे.

परंतू, आयुक्तांनी तुम्हाला सत्ताधारी भाजप आमदार, महापाैरांना भेटायला लागेल. सत्ताधारी पक्षाशिवाय मी कोणताही निर्णय घेवू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली. त्यावरुन उबाळे यांनी महापालिका आयुक्तांच्या या कृतिचा जाहीर निषेध केला आहे. पालिका आयुक्त हे सत्ताधारी भाजपच्या सोयीनुसार निर्णय घेवू लागले आहेत. सत्ताधा-यांना खुश ठेवण्यासाठी नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देत आहेत.

तसेच घरोघरचा कचरा संकलन करणे, तो मोशी डेपोपर्यंत वाहनातून जावून टाकणे, या कामातील ठेकेदार ओला व सुका कचरा वेगवेगळा करीत नाहीत. अनेक कामांच्या मुदती संपूनही त्याना मुदतवाढ दिली जात आहे. शहर स्वच्छतेत कामगारांचा कुटूंबाचा विचार न करता केवळ ठेकेदार पोसण्याचा उद्योग आयुक्तांनी चालविला आहे. स्वच्छतेतून आयुक्त हे नफा कमवण्याचा विचार लागल्याने त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो, असेही उबाळे यांनी म्हटले आहे. तसेच वेळप्रसंगी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून सदरील निविदा रद्द करण्याची मागणी करु, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button