breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कचराकोंडी’, 1 मार्चपासून सफाई कामगारांचे ‘कामबंद’चा एल्गार

स्वच्छ सर्वेक्षणाचा उडणार फज्जा; पोटाची भाकरी हिरावून घेतल्याने दोन हजार कामगार रस्त्यावर

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

‘स्वच्छ भारत अभियान’ची केंद्रीय पातळीवरील टीम पिंपरी चिंचवडमध्ये 1 मार्चनंतर सर्व्हेक्षणास येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करण्याची निविदा रद्द करा, अन्यथा दोन हजार सफाई कामगार कामबंद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाने शहरात कचराकोंडी निर्माण होईल. स्वच्छ भारत अभियानात पिंपरी चिंचवड शहर पिछाडीवर पडण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दैनंदिन रस्ते, गटर्स यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाची निविदा रद्द करा, ही मागणी शहर स्वयंरोजगार सेवा सह संस्थाचे फेडरेशनने महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचेकडे केली आहे. तसेच शासन अध्यादेशानुसार स्वयंरोजगार व बेरोजगार संस्थाना प्रतित्रा यादीद्वारे काम वाटप करावे, असेही म्हटले आहे.

या मागण्यांकडे आयुक्तांनी केराची टोपली दाखवली आहे. आयुक्तांनी सदरील निविदा रद्द करण्याबाबत सत्ताधारी भाजप नेत्यांनी चर्चा करावी, त्यांच्या निर्णयापुढे मी जावू शकत नाही, असं सांगितल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. परंतू, यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्याचे धोरण रद्द करावे, आठ प्रभागातंर्गत पुर्ननिविदा काढून 6,8 आणि 18 मीटर रस्त्यांची सफाई काम सेवा सहकारी संस्थाना द्यावे, सन 2011 ते 2015 मधील सर्व कामगारांचा पीएफ मिळावा, कामगारांच्या वेतनातील फरक मिळावा, आरोग्य सेवा सुविधा मोफत मिळाव्यात, सफाई कामगारांना ओळखपत्र द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे सादर केले आहे.

दरम्यान, सफाई कामगारांना किमान वेतनानूसार पगार मिळत नाही. दहा ते बारा तास ठेकेदार काम करुन घेतात. सर्व कामगारांना महापालिका सेवेत कायम करावे, अशीही मागणी फेडरेशनने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button