breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मंत्रिपद न मिळाल्याने आमदार समर्थकांनी पुण्यातील काॅंग्रेस भवनची केली तोडफोड

पुणे |महाईन्यूज|

भोर-वेल्हा विधानसभेचे काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीने ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने थोपटे समर्थकांनी पुण्यातील काॅंग्रेसचे भवन तोडफोड केली आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसचे सरकार आले तर मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र, काँगेसकडून थोपटे यांच्यावर मोठा अन्याय करण्यात आला. एकीकडे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले गेले पण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या व पक्ष वाढविण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतलेल्या माणसाला मंत्रिपदापासून डावलण्यात आले.

न्याय मिळत नाही म्हटल्यावर आमच्या संयमाचा बांध फुटला आहे. एकच दादा संग्राम दादा यांसारख्या घोषणांची जोरदार घोषणाबाजी करत थोपटे समर्थकांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनाची तोडफोड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button