breaking-newsमनोरंजन
‘कैसी हवा है धूली धूली, आज फिझा मै खुली खुली; सुनिधीने लेकासोबत गायले गाणं…
सुनिधी चौहान आजकाल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या या दोघा मायलेकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये सुनिधीचा मुलगा अतिशय मधूर आवाजात गाणे गाताना दिसत आहे.
सुनिधीच्या मुलाचे नाव तेग आहे. नुकताच सुनिधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबत गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेग आणि सुनिधी ‘कैसी हवा है धूली धूली, आज फिझा मै खुली खुली. कैसी हवा है धूली धूली, आज फिझा मै खुली खुली.आणि काटे नही कट ते हे गाणे म्हणताना दिसतेय.तेगसोबतचा हा व्हिडीओ शेअर करत सुनिधीने आमचे पहिले एकत्र गाणे असे कॅप्शन दिले आहे.