breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह १९ जणांविरुध्द गुन्हा दाखलं..

सोलापूर | महाईन्यूज |

अकलूज जवळील माळेवाडी-बोरगाव येथे जाऊन आपल्याच नात्यातील कुटुंबीयांना रिव्हॉल्व्हरने धमकावत त्यांचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह १९ जणांविरुध्द अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका पंचायत समितीच्या सात सदस्यांना पळवून नेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.

या गुन्ह्याचे मूळ माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे दिवंगत नातेवाईक पवनराजे निंबाळकर यांच्यातील वैमनस्याशी जोडण्यात आले असून माळेगाव बोरगाव येथे ज्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, ते हिंमतराव अशोकराव पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे साडू आणि पवनराजेंचे पुत्र तथा उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका आहेत. यासंदर्भात हिंमतराव पाटील यांनी स्वत: दिसेल्या फिर्यादीनुसार आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. इतर दहा साथीदारांची नावे अद्यापही समजूत शकलेली नाही…

अकलूजजवळ असलेल्या माळेवाडी बोरगाव येथे हिंमतराव पाटील यांच्या घरी कळंब तालुका पंचायत समितीचे सदस्य उतरले होते. रात्री हे सर्वजण घरात जेवण करीत असताना तेथे अचानकपणे पाच-सहा मोटारी आल्या आणि त्यातून १५ ते २० लोक उतरले. त्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील हेदेखील होते. त्यावेळी हिंमतराव पाटील हे घराच्या व्हरांडय़ात थांबले असताना राणा जगजितसिंह यांनी, माझी पंचायत समितीची माणसे तुम्ही पळवून आणली आहेत. ती माणसे कोठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावर खुलासा करीत असताना न ऐकता राणा जगजितसिंह पाटील यांनी, आपल्या सोबत आलेल्या व्यक्तींना घरात घुसण्याचा आदेश दिला. अद्वातद्वा बोलत आमदार राणा जगजितसिंह यांनी स्वत:जवळील रिव्हाल्व्हर काढून हिंमतराव पाटील यांना धमकावले. त्यावेळी त्यांच्या साथीदारांनी घरात घुसून मोडतोड केली. पत्नी मायादेवी यांनाही मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी संबंधित चौघाजणांना ताब्यात घेतले. हल्लेखोरांनी सोडून गेलेली मोटारही जप्त केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button