breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सलग १८ तासांत २०० गाण्यांचे गायन

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा आणि व्ही. पी. म्युझिक अकॅडमीतर्फे१८ तासाहून अधिक काळ गायनाचा विक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग २०० गाण्यांचे गायन या वेळी करण्यात आले.

उपक्रमाचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब पुणे शनिवारवाडाच्या अध्यक्ष अनिता पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष श्याम ढवळे, विवेक पांडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महाराष्ट्र गीताने समारोप झाला. कार्यक्रमात ६० गायक सहभागी झाले होते. वाद्यवृंदाबरोबर मराठी – हिंदी गाण्यांचे गायन करण्यात आले. सकाळी सातपासून मध्यरात्रीपर्यंत सलग १८ तास हा उपक्रम चालला.

धोत्रे म्हणाले, नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांना बळ देण्याचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. चिंतन मोढा, अर्जुन साठे, हर्षद गनबोटे, ऋतुराज कोरे, फिरोज रमजानी, विजय चेन्नूर, रियाझ शेख, शफी शेख, घनश्याम अगरवाल, मनीष गोखले, प्रभाकर पाटील आदी कलाकार उपक्रमात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button