breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगारास लुटणारे ६ लुटारू जेरबंद

– म्हाळुंगे पोलिस व गुन्हे शाखा क्राईम युनिट ३ ची कामगिरी

पिंपरी | प्रतिनिधी
कंपनी कामगारास अंधाराचा फायदा घेऊन लुटणारे ६ लुटारू जेरबंद झाले आहेत.
चाकण-तळेगाव रोडवर ही घटना घडली. म्हाळुंगे पोलिस व गुन्हे शाखा क्राईम युनिट ३ च्या पथकाने संयुक्तपणे ही कामगिरी करत ६ लुटारूना पकड़ले.

याप्रकरणी रवी दादु ठाकर (वय २४ वर्ष), योगेश नाथु मेंगाळ (वय २३ वर्ष), धनेश फकीर ठाकर (वय २२ वर्ष), लक्ष्मण कैलास मेंगाळ (वय २० वर्ष), निखील सखाराम मेंगाळ (वय २५ वर्ष), (सर्व राहणार – ठाकरवस्ती. रासे, ता खेड पुणे), समीर मिकाजी जाधव (वय २६ वर्ष, रा-ठाकरवस्ती, रेटवरडी, ता खेड जि पुणे) या सहा आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील मेट्रिक्स हॉटेल जवळ चाकण – तळेगाव रोडने अनिल मारुतराव शिंगणापुरे हे दि.२० जानेवारी २०२१ रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास कंपनी मधुन सुट्टी झाल्यानंतर मोटार सायकल वरुन घरी जात होते. त्यावेळी त्यांना ६ अज्ञात चोरट्यांनी अडवुन त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल फोन असा सुमारे १५ हजार १५० रुपयांचा ऐवज लुटला होता. त्याबाबत त्याांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यामध्ये या लुटारुंबाबत काहीएक उपयुक्त माहीती प्राप्त होत नव्हती. गुन्हे शाखेच्या क्राईम युनिट ३ चे अधिकारी व स्टाफच्या मदतीने तांत्रिक गोष्टींच्या आधारे व गोपणीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ०३ संशयीत व्यक्तिंना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या इतर ३ साथीदारांना अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १-मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार व क्राईम युनिट ३ चे पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गिरीष चामले, पोलीस फौजदार तात्या टोपे, मधुकर पानसरे, पोलीस हवालदार प्रकाश नवले, ज्ञानेदव आटोळे, श्रीधन इचके, किरण सांगळे, आणि क्राईम युनिट ३ चे पोलीस हवालदार कोळेकर, ढाकणे, नांगरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button