breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालय खासगीकरणास भाजपची सूट, सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची लूट

  • भाजपच्या खासगीकरण धोरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. नागरिकांना आरोग्य सुविधा देणं, महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतू, महापालिकेला तज्ञ डाॅक्टर मिळत नाहीत म्हणून रुग्णालय बांधून ते ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. तो भोसरी रुग्णालय खासगीकरण ठराव रद्द करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, पीएमटी चाैकात आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता आंदोलन करण्यात आले.  राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोसरीमधील सर्व्हे नं १ मधील गावजत्रा मैदानाजवळील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचे खाजगीकरण होत आहे. भोसरीतील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे की, हे हॉस्पिटलचे खाजगीकरण न होता, ते हॉस्पिटल सरकारीच रहावे, त्यामुळे महापालिकेने तो ठराव रद्द करावा, हे हॉस्पिटल महापालिकेने चालवावे, जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ होईल. 

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने,  नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे,अजित गव्हाणे, अनुराधाताई गोफणे, संजय वाबळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक कार्यध्यक्ष योगेश गवळी, भागावत जवळकर, मानव कांबळे, मारूती भापकर, आनंदा यादव, मनिषा गटकळ, संतोष लांडगे, पंडीत गवळी, मारूती शिंदे, विराज लांडे, सचिन शिंदे, शिला भोंडवे, जालिंदर शिंदे, शिवाजी लांडगे, मयुर जाधव, मंगेश बजबळकर, सचिन कंद, अमित लांडगे, सतिष फुगे, विकास भुंबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यासाठी भोसरीतील नागरिकही आंदोलनात सहभागी झाले होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button