breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिला बचतगटांसाठी मिशन स्वावलंबन कार्यक्रम, आर्थिक विकास महामंडळाची होणार नियुक्ती

  • महिला व बालकल्याण समितीसमोर प्रस्ताव
  • उपक्रमासाठी तीन वर्षात तीन कोटी 3 लाख 48 हजार 150 रुपये खर्च

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचतगटांसाठी मिशन स्वावलंबन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाची तीन वर्षाकरिता नियुक्ती करुन महिला सक्षमीकरण धोरण राबविणार आहेत. त्यास महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने आज (शुक्रवार) झालेल्या बैठकीत तहकूब ठेवला आहे.

शहरात महिला बचत गट मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने महिला सक्षमीकरणाची भूमिका महत्वपुर्ण आहे. या बचतगटातील महिलांची क्षमता विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे, रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करणे, संस्थात्मक बांधणी, आर्थिक साक्षरता, रेकाॅर्ड व्यवस्थापन, डिजिटल साक्षरता या माध्यमातून बचतगटांचे व्यवस्थापन मजबूत करणे. तसेच इकोसिस्टीम तयार करणे, वस्तीपातळीवर सर्व्हेक्षण करणे. त्याचे माहितीचे संकलन संगणकाद्वारे करणे, शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणे, बचत गटांना कुवतीनूसार व्यवसायाची निवड करणे, उद्योग व व्यवसायास प्रवृत्त करणे आदी उपक्रम मिशन स्वावलंबन कार्यक्रमातून राबविणार आहेत.

या कामासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ संस्थेकडून प्रस्ताव आला आहे. सदर प्रस्तावानूसार 3 वर्षासाठी एकूण खर्चाचा आर्थिक आराखडा 3 कोटी 3 लाख 48 हजार 150 रुपयाचा सादर केला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेने थेट 2019-20 ते 2021-22 या आर्थिक वर्षाच्या कालावधीस नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे या संस्थेला थेट पध्दतीने काम देण्यास महिला व बालकल्याण समितीकडे प्रस्ताव तहकूब केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button