breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळला

– पूर आल्यानं नदीकाठावरील घरांना तडाखा बसला; अनेकजण बेपत्ता

पिंपरी | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यापार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.

राज्य सरकारनं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जोशी मठाजवळ एक हेलिकॉप्टर पाठवलं आहे. त्याचबरोबर केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली आहे. या घटनेत पाण्यामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला असून, अनेक जण वाहून गेल्याचं वृत्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button