breaking-newsमनोरंजन

करीनाच्या टेलिव्हिजन शोबाबत सैफला सतावते ही चिंता

रुपेरी पडद्यावर कायमच आपल्या अभिनयकौशल्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच छोट्या पडद्यावर सुद्धा आगमन करणार आहे. टेलिव्हिजन विश्वातील तिच्या या पदार्पणासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शो मधून ती छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विविध भूमिका उत्तमप्रकारे निभावणारी ही अभिनेत्री स्पर्धकांच्या नृत्याचे कसे परीक्षण करते हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.

टेलिव्हिजन विश्वातील या पदार्पणासाठी अनेक कलकारांनी करीनाला पाठींबा दिला आहे. परंतु करीना तिचे काम आणि मातृत्व कशा प्रकारे संभाळणार असा प्रश्न सैफला पडला आहे. सैफला तिची चिंता वाटत असल्याचे करीनाने सांगितले आहे.

‘डीएनए’सह झालेल्या एका मुलाखतीमध्ये करीनाने याचा खुलासा केला आहे. ‘माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने मला पाठींबा दिला. पण काम आणि घर मी कसे सांभाळणार ही चिंता सैफला वाटत आहे. तु एक स्टार आहे आणि तू करुन दाखवशील अशी माझी खात्री आहे असे सैफ पुढे म्हणाला’ असल्याचे करीनाने सांगितले.

कोरिओग्राफर बॉस्को मार्टीस व रॅपर रफ्तार यांच्यासोबत करीना शोमध्ये परीक्षण करणार आहे. टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी खूप वेळ द्यावा लागतो ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे. पण करीनाने नुकतच एका मुलाखतीत तिने सांगितले की, “मी टेलिव्हिजन पदार्पण करत असले तरीसुद्धा मी फार वेळ शूटिंगसाठी देऊ शकत नाही. मी दिवसातून केवळ आठ ते दहा तासंच शूटिंग करणार आहे.” तैमूरसाठी तिने हा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजन विश्वाच्या इतिहासात या शोसाठी करीनाला सर्वाधिक मानधन मिळाल्याचे देखील म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button