breaking-newsमनोरंजन

…म्हणून सलमानचा फोटो खिशात घेऊन फिरायचे जॅकी श्रॉफ

सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. एकेकाळी जॅकी श्रॉफ सलमानचे फोटो खिशात घेऊन फिरायचे. हा किस्सा त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितला आहे.

‘१९८८ साली प्रदर्शित झालेल्या फलक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी सलमानचे बरेच फोटो काढले होते. ते फोटो मी माझ्या खिशात घेऊन फिरायचो. केसी बोकाडिया, सुभाष घई यांसारख्या निर्मात्यांना सलमानचा फोटो दाखवून त्याला चित्रपटात काम देण्यासाठी विचारलं होतं. सलमान खान एकेदिवशी स्टार नक्की होईल असं मला वाटायचं. आता मला त्याच्या वडिलांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तो माझ्यासाठी तेव्हाही छोटा मुलगा होता आणि आताही तसाच आहे,’ अशा शब्दांत जॅकीने सलमानबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. एकेकाळी सलमान माझा खूप मोठा चाहता होता. ‘माझे बुट आणि जीन्स त्याला प्रचंड आवडायचे,’ असेही जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोवर, नोरा फतेही आणि दिशा पटानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी ‘भारत’ने दणक्यात कमाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button