breaking-newsमनोरंजन

तमिळ चित्रपट ‘वीरम’च्या रिमेकमध्ये विकी कौशल?

‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमुळे प्रकाश झोतात आलेले अभिनेता म्हणजे विकी कौशल. विकी कौशलने त्याच्या दमदार अभिनायाने अनेकांची मने जिंकून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख तयार केली. विकीचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट सुपरहीट चित्रपट ठरला. त्यानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. आता विकी एका तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशला तामिळ चित्रपट ‘वीरम’साठी विचारण्याच आले आहे. ‘वीरम’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव ‘लँड ऑफ लुंगी’ असे ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहद सामजी करणार असून निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटाच्या रिमेकसाठी विकी कौशलआधी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. अक्षयने चित्रपटाबाबत साजिदशी चर्चादेखील केली होती. परंतु अक्षयच्या तारखा जुळत नसल्यामुळे त्याने चित्रपटास नकार दिला. नकार देताना अक्षयनेच निर्मात्यांना विकी कौशलचे नाव सुचवले असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच विकी कौशलने या चित्रपटासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांची भेट घेतली आहे. दरम्यान विकीला या चित्रपटाची कथा फार आवडली असल्याचे देखील म्हटले जात आहे. सध्या विकी त्याचा आगमी चित्रपट ‘उधम सिंग’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यानंतर विकी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटात काम करणार आहे असून आणखी एका भयपटात देखील काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘वीरम’ हा २०१४मध्ये प्रदर्शित झालेला एक तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती विजया प्रोडक्शन हाऊसने केली. या चित्रपटात अभिनेता अजीथ कुमार मुख्य भूमिकेत आहे. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची उत्सुकता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button