breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL Auction 2024 : कोणकोणत्या खेळाडूंचं नशीब चमकणार? उद्या होणार लिलाव

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या २०२४ हंगामाचा लिलाव उद्या म्हणजेच मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे लिलाव होणार आहे. यामध्ये एकूण ३३३ खेळाडूंचा लिलाव होणार आहे तर संघांना ७७ स्लॉट आहेत. त्यापैकी ३० विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.

यामध्ये २३ खेळाडूंनी २ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे तर १३ खेळाडूंची नोंदणी १.५ कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये करण्यात आली आहे. ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत. तसेच त्यामध्ये दोन सहयोगी देशांचा समावेश आहे.

हेही वाचा  –  आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? उद्धव ठाकरेंचा खोचक टोला 

यंदाच्या वर्षी गुजरात टायटन्स ३८.१५ कोटी रुपयांच्या सर्वाधिक पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी १४.५ कोटी रुपयांची पर्स आहे.

IPL २०२४ लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स हे IPL २०२४ लिलावाचे अधिकृत प्रसारक आहे. तसेच IPL २०२४ लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button