breaking-newsपुणे

एटीएममध्ये चोरी करणाऱ्यास अटक

पुणे – एटीएम सेंटरमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. एटीएमच्या गस्तीवरील पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने आरोपीला जेरबंद करता आले.

आनंद रमेश बरगुळे (18, रा. कासेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहित सलेर (रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवार पेठेतील नरपतगीरी चौकात एचडीएफसी बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. येथे सव्वा दोनच्या सुमारास आरोपी आनंद बरगुळे हा साथीदारासह एटीएम सेंटरमध्ये घुसला. त्याने प्रथम एटीएम सेंटरचे कॅमेरे फोडले. यानंतर एटीएम सेंटरच्या समोरील पत्रा वाकवून आतील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएचा पत्रा वाकवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गस्तीवरील पोलिसांना हे दोघे एटीएम सेंटरमध्ये दिसले. त्यांनी तेथे धाव घेताच आनंद बरगुळे हा त्यांच्या हाती लागला. यामध्ये एटीएमचे सुमारे 30 हजाराचे नुकसान झाले. एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एन. ए. अतकरे यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button