breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सारथी’ची जबाबदारी अजित पवारांकडे का दिली?

‘सारथी’ संस्था बंद पडणार असल्यांच्या चर्चा होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्थीची जबाबदारी उचलली आहे . त्यामुळे आता सार्थी बंद पडणार नसून त्यासाठी आता 8 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.

मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापण्यात आलेली ‘सारथी’ संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. ‘सारथी’ला सरकारकडून येणे असलेले शिष्यवृत्तीचे पैसे रखडले होते. त्यावरून मराठा संघटनांनी व भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं अजित पवार यांनी या संदर्भात मंत्रालयात सविस्तर बैठक घेतली. त्यात ‘सारथी’च्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ही संस्था बंद पडू दिली जाणार नाही. संस्थेला ८ कोटींची आर्थिक मदत तातडीनं दिली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘सारथी’चं काम अजित पवार यांच्याकडं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली. ‘सारथीचं काम यापुढं अधिक वेगवान व्हावं म्हणून मी स्वत: अजितदादांना तशी विनंती केली होती. माझ्याकडचा विभाग काढून घेतला असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याकडं असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा कारभारही अजित पवार यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं ह्या दोन्ही विभागाची कामं आता सुस्साट वेगानं पुढं जातील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button