breaking-newsपिंपरी / चिंचवड

उन्नतीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उदघाटन उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केले. यावेळी संस्थापक संजय भिसे उपस्थित होते.

पर्यावरणाची सुरक्षा व घरी बसून तयार केलेल्या गणेश मूर्तीचा आनंद मिळावा, या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केली होती. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख संजय भिसे यांनी दिली. कार्यशाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

नागरिकांना व मुलांना शाडू माती मोफत वाटप केली. कार्यशाळा दहा ते बारा या वेळेत घेण्यात आली. कार्यशाळेचे संचालन भगवान भोसले व सुधीर लांडगे यांनी खूप छान पद्धतीने मुलांना व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

संस्थेचे संस्थापक संजय तात्याबा भिसे म्हणाले की, आपण घरी तयार केलेले शाडू मातीच्या गणेशमूर्ती घरी बसवावेत, पर्यावरण संरक्षणास हातभार लावावा. या गणेशमूर्तीचं घरीच विसर्जन करावं. विसर्जन झालेल्या मातीत उन्नती सोशल फाउंडेशनकडून दिलेले तुळशीचे रोप लावावे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button