breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका बनली भ्रष्टाचाराचे कुरण

  • महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
  • पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मागील पाच वर्षात राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने पिंपरी-चिंचवड मधील एकही प्रश्न सोडविला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन आणि भाजप पदाधिका-यांच्या अभद्र युतीमुळे महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. त्याचा फटका थेट शहराच्या विकासावर पडत आहे, असा आरोप करत शहरातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात साने यांनी अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड शहरातील एकही प्रश्न सुटलेला नाही. भाजपने खालील प्रश्न मार्गी लावले नाहीत, असा आरोप साने यांनी निवेदनात केला आहे.

1 ) अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे व १०० टक्के शास्ती कर माफ करणे.

२ ) कृत्रिम पाणी टंचाई दूर करावी.

३ ) करसंकलनांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कच -यांच्या निविदेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे. त्यांची सविस्तर चौकशी करावी.

4) वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी.

5) शितलबाग पादचारी मार्गतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.

6 ) ‘वायसीएमएच’ मधील प्राध्यापक व सहा. प्राध्यापकांची भरती घोटाळ्याची चौकशी करावी.

7 ) ग्रामीण भागातील रस्ते विकसित करणे या निविदेतील भ्रष्टाचाराबाबत चौकशी करावी.

8 ) पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी.

9 ) सन २०२० – २१ च्या मनपा अंदाजपत्रकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागामध्ये भरीव निधीबाबत आयुक्तांना आदेश देण्यात यावेत.

या मुद्दयांबाबत ठोस निर्णय घेऊन वरील सर्व प्रश्न मार्गी लावल्यास आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा अंदाज साने यांनी निवेदनात व्यक्त केला आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button