breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप नेत्यांकडून महापौर, उपमहापौरांना दिली तंबी, अर्ज दाखल करतेवेळी या आहेत अटी

सर्वांना संधी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, हा ठरला फॉर्म्युला

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर पदासाठी भाजपकडून माई ढोरे आणि उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, पक्ष सांगेल तेव्हा त्यांना राजीनामे द्यावे लागेल, या अटी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोघांना घालण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांना संधी देताना अडीच वर्षात सहा जणांना संधी देण्यात येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील महिला महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच आडीच वर्षे महापौर म्हणून काम करण्याची संधी कोणाला मिळणार यावर शहरात खल झाला. मात्र, भाजपच्या नेत्यांनी पुढील अडीच वर्षात तीन व्यक्तींना महापौर पदी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चालू पंचवार्षिकीत खुल्या गटातील प्रथम महापौर होण्याची संधी नगरसेविका माई ढोरे यांना देण्याची भाजपची तयारी दिसते. तर, उपमहापौर पदासाठी क्रिडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांचा अर्ज दाखल करून घेतला आहे.

”अडीच वर्षे तीन महापौर-उपमहापौर” या भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार जर माई ढोरे यांना संधी मिळाली तरी ती नऊ महिने राहणार आहे. उपमहापौर पदाचा कार्यकाळ तेवढाच ठेवला जाणार आहे. असा निर्णय भाजपच्या शहर नेतृत्वाने घेतल्याची माहिती आहे. आज माई ढोरे आणि तुषार हिंगे या दोघांना पक्ष सांगेल तेव्हा राजीनामा द्यावा लागेल, या अटीवर महापौर, उपमहापौर पदाची उमेदवारी दिली आहे. शेवटी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्यच करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button