breaking-newsराष्ट्रिय

अधिकारी, केजरीवाल वाद गेला हायकोर्टात

  • सोमवारी होणार सुनावणी

 
नवी दिल्ली – दिल्लीतील सरकारी कामकाजावर बहिष्कार घालून जनतेला नाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवालांनी राज्यपालांच्या निवासस्थानातच धरणे धरले आहे. हा विषय आता कोर्टात गेला असून दिल्ली उच्च न्यायालयात या विषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच केजरीवाल यांच्याही विरोधात परस्पर विरोधी याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यांची येत्या 18 जुनला एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे.

आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी कामकाजावरील बहिष्कार मागे घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी त्या अधिकाऱ्यांना केली पहिजे अशी मागणी यातील एका याचिकेत करण्यात आली आहे. ऍडव्होकेट उमेश गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी दिल्लीतील या मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय सेवा शर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

सार्वजनिक कामांसाठी मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना हे अधिकारी उपस्थित राहात नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही हे अधिकारी जात नाहीत यामुळे जनतेची कामे खोळंबली असून या अधिकाऱ्यांन आता चाप लावलाच पाहिजे असे गुप्ता यांनी या याचिकेत नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button