breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी BMCकडे करावं लागणार Online Slot Booking; अर्ज कसा करायचा पाहूयात

गणेशोत्सव आता काहीच दिवसांच्या तोंंडावर आलेला असताना बीएमसी ने नागरिकांंच्या सोयीसाठी एक नवा नियम तयार केला आहे. यंंदा गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी जाताना , बीएमसीच्या डी-वॉर्ड आणि सी-वॉर्डने गर्दी टाळण्यासाठी गणेश मंडळे व रहिवाशांना विसर्जनसाठी ऑनलाईन स्लॉट बुक करण्यास सांगितले आहे. हा अर्ज shreeganeshvisarjan.com या वेबसाईटवर करता येणार आहे. गणेश मूर्ती घरी आणून विसर्जन करण्याची इच्छा असणार्‍यांना तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवुन सांगायचे आहे. अर्ज केल्यानंतर, बीएमसी त्यानंतर तपासणी करुन स्लॉटचे वाटप करेल. अहवालानुसार भाविकांना ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी विसर्जन ठिकाणी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान अर्ज कसा करावा हे जाणुन घेऊयात.

गणपती मुर्ती विसर्जना साठी ऑनलाईन स्लॉट बूकिंग कसा करायचा?
-महानगरपालिके ची अधिकृत वेबसाइट shreeganeshvisarjan.Com सुरु करा.

-मंडळाचे किंवा व्यक्तीचे नाव आणि संपर्क तपशील टाका

-प्रभाग निवडा: डी-वार्ड किंवा सी-वॉर्ड

-प्रभाग निवडल्यानंतर, ज्या ठिकाणी त्यांना विसर्जन करायचे आहे ते निवडा.

-गणपती विसर्जनासाठी तारीख आणि वेळ टाका

-आपला अर्ज सबमिट करा

दरम्यान याशिवाय, या वर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्रदेखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येणार आहे. मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच 167 कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली जाणार आहे असेही मुंंबई महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमावलीत म्हंंटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button