breaking-newsआंतरराष्टीय

इसिसच्या पाच मोस्ट वॉंटेड कमांडर्सना इराकमध्ये अटक – डोनॉल्ड ट्रम्प

सीरिया – इसिसच्या पाच मोस्ट वॉंटेड कमांडर्सना इराकमध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी स्वत:च ट्विट करून ही माहिती दिली आहे. इसिसच्या या कमांडर्सना सीरियाच्या सीमाभागात पकडण्यात आले असल्याचे वृत्त इराकी मीडियाने दिले आहे. मात्र इसिसचा म्होरक्‍या अबु बकर अल बगदादी याच्याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या पाच कमांडर्सना पकडण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच कारवाई सुरू करण्यात आली होती. प्रथम सीरिया आणि तुर्की येथे लपून असणाऱ्या या कमांडर्सचा मागोवा घेण्यात आला आणि नंतर त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या या पाच कमांडर्समध्ये 4 इराकी आणि एक सीरियन नागरिक आहे. पाचही जण सीरियामधील इसिसच्या कारवाया घडवून आणत होते. या कारवाईत इस्माईल अल्वान अल-इथावी नावाच्या इराकी नागरिकावर सीरियापासून तुर्कीपर्यंत नजर ठेवून त्याचा पाठलाग करण्यात आला होता. इथावी आपल्या पत्नीचा भाऊ बनून तुर्कीमध्ये राहत होता. 15 फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सीरियातील हासिन भागात इसिसच्या 39 संदिग्ध दह्शतवाद्यांवर हल्ला करण्यात आला.
नंतर इथावीकरवी निरोप पाठवून त्याच्या साथीदारांना बोलावून घेण्यात आले आणि ते सीरियाच्या सीमाभागात येताच त्यांना अटक करण्यात आली असे मीडियाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button