breaking-newsआंतरराष्टीय

जीएसटीमुळेच मलेशियाच्या पंतप्रधानांची सत्ता गेली…

क्वालालम्पूर (मलेशिया) – भारतात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करण्यात आला आहे. मलेशियात त्यापूर्वी, म्हणजे सन 2015 मध्ये जीएसटी लागू करण्यात आला. मात्र जीएसटी लगू करण्यामुळेच मलेशियाच्या पंतप्रधानांना सत्ता गमवावी लागली आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाका यांना 92 वर्षीय महातिर मोहम्मद यांनी पराभूत केले. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय हा एक अत्यंत कठीण निर्णय असल्याचे म्ह्टले होते. जीएसटी लागू केल्यानंतर अनेक वस्तू आणि सेवा महाग होतील हे आम्हाला माहीत होते, पण देशहिताच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्‍यक असल्याचे स्पष्टिकरणही त्यांनी दिले होते.
विजयी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी जीएसटीवर टीका केली होतीच, पण निवडून आल्यावर जीएसटी रद्द करण्याचे आश्‍वासनही दिले होते. त्यामुळे जीएसटी रद्द करण्यासाठीच मलेशियाच्या जनतेने मोहम्मद यांना सत्ता दिल्याचे बोलले जात आहे.

1993 साली कॅनडामध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे पंतप्रधान किम कॅंपबेल यांनी जीएसटी लागू केला आणि परिणामी त्यांनाही सत्ता गमावावी लागली. लिबरल पार्टीला बहुमत मिळून जीन शिरेटिन पंतप्रधान झाले. ऑस्ट्रेलियात जॉन हॉर्वड यांना जीएसटी लागू केल्यानंतर मोठ्य मुश्‍किलीने पुन्हा सत्ता मिळवता आली होती. एकूणच महागाई वाढवणारी जीएसटी ही सत्ता घालवणारी पनवती असल्याचे चित्र दिसत आहे. जीएसटी लागू केल्यापासून भारतात व्यापार करणे सुलभ झाले आहे. कर बुडवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. करप्रक्रियेत सोपेपणा आला आहे. सरकारी उत्पन्नात मोठी भर पडली आहे. परिणामी जीडीपी वेगाने वाढणार आहे. मोदी सरकार जीएसटीचे असे अनेक फायदे सांगत असली, तरी मलेशियातील निकाल पाहता भाजपाचा डाव उलटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button