breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प, पुतीन यांच्या जीवाला धोका; प्रसिद्ध बाबा वांगाची भविष्यवाणी

येणारे नवे वर्ष जगासमोर नवीन आव्हाने, नवीन समस्या घेऊन येणारे आहे. दोन मोठ्या देशांच्या प्रमुखांच्या जीवाला धोका असल्याची भविष्यवाणी बुल्गेरियाच्या बाबा वांगा हिने काही दशकांपूर्वीच केलेली आहे. वांगा हिने 9/11 चा दहशतवादी हल्ला, बराक ओबामा राष्ट्रपती होणार यावर भविष्यवाणी केल्याचे सांगितले जात आहे. या दोन भविष्यवाणींप्रमाणे 2020 मधील तिच्या भविष्यवाणी खरी ठरली तर अमेरिका, युरोप, रशियावर मोठे संकट ओढवणार आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या महाभियोगाच्या संकटात आहेत. त्यांना पुढच्या वर्षी गंभीर आजार होणार असून यामुळे ते बहीरे होतील असे म्हटले आहे. अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपतींना ऐकायला न येणे आणि ब्रेन ट्युमरसारखा गंभीर आजार होईल. हा आजार क्य़ुबामध्ये काही अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना झालेला तसाच असणार असल्याचे बोलले जात आहे. 

तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्यावर जीवघेणा हल्ला होणार असून त्यांची हत्या केली जाणार आहे. हा हल्लेखोर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असलेला अधिकारी असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पुतीन यांनी त्यांच्यावर याआधी चारवेळा हत्येसाठी प्रयत्न झाल्याचे म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button