breaking-newsआंतरराष्टीय

इराकमधील अमेरिकी दुतावासाजवळ रॉकेट हल्ला; इराणवर संशय

महाईन्यूज

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अद्याप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट हल्ले झाल्याचे वृत्त आहे. रविवारी रात्री हे हल्ले झाले असून त्यामागे इराणचा हात असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अद्याप कोणीही याची जबाबदारी घेतलेली नाहीये.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बगदादमधील ग्रीन जोन येथील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. ग्रीन जोन हा भाग मध्य बगदादमध्ये आहे. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत. इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका याच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दुसरीकडे बगदादमध्ये इराकी सरकारविरोधातील असंतोष शमण्याची चिन्हे नाहीयेत. इथल्या सरकारची कामाची पद्धत तसेच अमेरिकेचे सैन्य बऱ्याच काळापासून देशात ठाण मांडून बसल्याने अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनांमुळे इराकमध्ये सध्या मोठे तणावाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button