breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलेदार आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला

  • युवानेते शेखर ओव्हाळ युवा मंचतर्फे उद्या शिलेदारांचा सन्मान सोहळा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ यांच्या शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने पिंपरीचे शिलेदार, पुस्तक प्रकाशक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला आणि शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हस्ते सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सोमवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ यांच्या शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने अभीष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. तसेच ‘पिंपरीचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचेही प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button