breaking-newsआंतरराष्टीय

कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये तब्बल ८० जणांचा मृत्यू; भारतातही पहिला संशयीत आढळला

महाईन्यूज |

चीनमध्ये आढळून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने अमेरिकेसह जगातील डझनभर देशांमध्ये थैमान घातलेले आहे. जगातील सर्वच देश या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, भारतातही या विषाणुचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच चीनमध्ये या विषाणुने मृत्यू झालेल्यांची संख्या ८०वर पोहोचली आहे. भारतात जयपूर येथे रविवारी कोरोनाची लागण झालेला एक संशयीत रुग्ण आढळून आला आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला या आजाराची लागण झालेली आहे. जयपूरमधील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात परतल्यानंतर त्याच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आलेली आहेत.

राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी सवाई मानसिंह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला याबाबत खबरदारीचे आदेश दिले आहेत. चीनहून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या या संशयीत विद्यार्थ्यावर स्वतंत्र खोलीत उपचार केले जात आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तपासणीचे निर्देशही देण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासनाने या संशयीत रुग्णाचे नमुने पु्ण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button