breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्र

अटीतटीच्या लढतीत भारताचा 4 विकेट्सनी पाकिस्तानवर विजय

नवी दिल्ली । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 4 विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या दिलेले 160 धावांचे आवाहन पूर्ण केले. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करताना 160 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. पाकिस्तानने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताकडून फलंदाजी करताना रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले.

भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला. भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याने नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी सामना 30 चेंडूत 60 धावा असा आणला. मात्र फिरकीपटूंविरूद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक आणि विराट कोहलीची पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येताच धावगती मंदावली.

विराट कोहलीने फटकेबाजी सुरू करत 19 वे षटक टाकणाऱ्या हारिस रौऊफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. तो 36 चेंडूत 40 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूत 13 धावा असा आणला. मात्र नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली.

विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 चेंडूत 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. त्यानंतर पुढच्या चेंडूत नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button