breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकासकामे रखडली

– स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांचा विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा

– आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील प्रलंबित नागरी विकासकामे मार्गी लावा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांनी केली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्याबाबत निवेदन दिले आहे. या वेळी आयुक्तांना भेटून विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांबाबत चर्चा करण्यात आली.

वाबळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या ताब्यातील पेठ क्रमांक ७ लगत असणाऱ्या भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्रातील सार्वजनिक सुविधा देणे गरजेचे आहे. विविध सुविधेसाठी आरक्षित असणारे भुखंड महापालिकेने ताब्यात घेणे गरजेचे आहे. यामध्ये जलतरण तलाव, योगा – ध्यान केंद्र, मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय ग्रंथालय व आर्ट गॅलरी, अग्निशामक केंद्र, शासकीय कार्यालये, फॅसिलिटी सेंटर, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, बस टर्मिनल्स, वाहनतळ याचा विकास करण्यासाठी ज्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशन व स्केटिंग रिंक करण्यासाठी प्राधिकरणाकडून भूखंड महापालिकेच्या ताब्यात हस्तांतरण करून विकसित केले. त्याप्रमाणे सुविधा केंद्रातील भूखंड महापालिकेने प्राधिकरणाकडून घेणेकामी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी, अशी मागणी वाबळे यांनी केली.

तसेच मागील ४ वर्षांपासून इंद्रायणीनगर पेठ क्रंमांक २ मधील भाजीमंडई बांधून पुर्ण झाली. मात्र सध्या तीची दूरावस्था झाली आहे. येथील गाळ्यांचे वाटप रखडले आहे. तातडीने या गाळ्यांचे स्थानिकांना वाटप करून मंडई सूरू करावी. भाजीमंडई लगत असणाऱ्या दवाखाण्याची इमारत बांधकामाच्या कामाची निविदा प्रसिध्द् करून काम सुरू करावे. पेठ क्रंमांक १ मधील ५ वर्षांपासून रखडलेले अपूर्ण स्केटिंग मैदानाचे काम पूर्ण करावे. पेठ क्रमांक ४, ६, ९ व १० मधील कोटयावधी रुपये खर्च करून बांधलेली विविध खेळांची मैदाने याठिकाणी दुरुस्ती करून घेऊन क्रिडा विभागाने याकडे लक्ष द्यावे. पेठ क्रंमांक ३ व ४ मधील नवीन विकसित उद्यानातील उर्वरित कामे करून उद्याने नागरिकांना खुली करावीत. पुणे -नाशिक महामार्ग लगत सेवा रस्ता, समतल विलगक, भुयारी मार्ग, पादचारी पुल सूविधा निर्माण कराव्यात, अशी मागणीही या वेळी वाबळे यांनी केली.

तसेच बालाजीनगर, गवळीमाथा, गणेशनगर व खंडेवस्ती भागातील झोपडपट्टयांचे पूर्नवसन करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने एसआरए प्रकल्प राबवावा. मागील ४ वर्षांपासून जुन्या विद्युत दिव्यांच्या जागी नवीन ऊर्जा बचत एलईडी दिवे लावावेत. इंद्रायणीनगर डिस्टीक्ट सर्कल याठिकाणी फिरावयास व व्यायाम करण्यास  येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधून या परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी वाबळे केली.

या वेळी बालनगरीमधील मुळ संकल्पनेशी निगडीत प्रस्तावित ललित कला अकादमीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान विविध समस्यांवर चर्चा करून आयुक्त हर्डीकर यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीतून संपर्क साधून सुचविलेली कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button