breaking-newsराष्ट्रिय

२४ तासात कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. २४ तासात देशात ११,९२९ रुग्ण वाढले आहेत.  देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ३.२० लाखावर गेली आहे. देशात मागील २४ तासात ३११ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण संक्रमणाची संख्या ३,२०,९२२ वर पोहोचली असून १,४९,३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १,६२,३७९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मृतांचा आकडा वाढून आता ९१९५ झाला आहे. WHO च्या माहितीनुसार संपूर्ण जगात कोरोना संक्रमाणाची संख्या ७५ लाखांवर गेली आहे.

– महाराष्ट्रात कोरोनाचे ३,४२७ रुग्ण शनिवारी वाढले तर ११३ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात संक्रमणाची संख्या आता १.४ लाखाहून अधिक झाली आहेत तर मृतांचा आकडा ३८३० वर पोहोचली आहे.

– एकट्या मुंबईत, ५६,८३१ रुग्ण असू न २,११३ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

– गुजरातमध्ये ५१३ रुग्ण वाढले असून ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २३,०७९ वर पोहोचली असून १४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

– तामिळनाडूमध्ये सुमारे 2 हजार नवीन रुग्ण वाढले असून एकूण रुग्ण संख्या ४१६८७ वर पोहोचली आहे. 

– हरियाणामध्ये शनिवारी ४१५ नवीन रुग्ण वाढले असून राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६७४७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत येथे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button