breaking-newsआंतरराष्टीय

मेंदू शस्त्रक्रियेवेळी रुग्ण गिटार वाजवत होता !

बंगळुरू:  ‘गिटारिस्ट डिस्टोनिया’ या आजाराशी गेल्या चार वर्षांपासून झुंजणारा बांगलादेशी गिटारवादक तस्कीनच्या मेंदूवर बंगळुरूतील भगवान महावीर जैन रुग्णालयात नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णालयातील जेआयओएम एसएन विभागाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना तस्कीन उत्कृष्ट गिटारवादन करत होता.

तस्कीनवर ब्रेन सर्किट सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असताना तो गिटार वाजवत होता. डॉक्टरांशी संवादही साधत होता. त्याशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते, असे डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. संजीव सी. सी. यांनी सांगितले, ‘तस्कीनने २००८मध्ये गिटारवादनाला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला त्रास जाणवू लागला. एका वर्षात उजव्या हाताच्या सर्व बोटांना त्रास होऊ लागला. त्याचे गिटार वाजवणे पूर्णपणे बंद झाले होते. तपासणी केली तेव्हा त्याला ‘गिटारिस्ट डिस्टोनिया’चे निदान झाले. त्याच्यावर ‘ब्रेन सर्किट सर्जरी’ करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यात ‘ब्रेन सर्किट’ जाळले जातात. ते ‘सर्किट’ माहिती करून घेण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाने गिटार वाजवणे आवश्यक असते.’

डॉ. शरण श्रीनिवासन यांनी सांगितलं की, ‘शस्त्रक्रियेनंतर तस्कीनची सर्व बोटे आता पूर्वीसारखीच कार्यरत झाली आहेत. गिटारिस्ट डिस्टोनिया ही एक असामान्य व्याधी आहे. एक टक्का संगीतकार या आजाराने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या त्रस्त असतात.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button