breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दहावी आणि बारावीचे परिक्षा शुल्क भरण्यास स्थायीची मान्यता

पुणे – पुणे महापालिकेच्या महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या 1 लाख 81 हजार रुपये परिक्षा शुल्क भरण्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, पुणे महापालिकेच्या 43 शाळा आणि 5 महाविद्यालये आहेत. त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावी आणि बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क भरण्यास अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यातून सुमारे 105 विद्यार्थ्यांचे 1 लाख 81 हजार 125 रुपये परिक्षा शुल्कापोटी एसएससी आणि एचएससी बोर्डात भरण्यास मान्यता देण्यात आली.

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोसमहाविद्यालय, भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशाला, मंगळवार पेठेतील बाबुराव सणस प्रशाला, भवानी पेठेतील रफी अहमद किडवई ऊर्दू हायस्कूल, येरवडा येथील हकीम अजमलखान उर्दू विद्यालयातील हे 105 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button