breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

इंद्राणी मुखर्जी पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. इंद्राणीने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जे. जे.रुग्णालयात हलवण्यात आले. आयएनएक्‍स मीडियाची सहसंस्थापक असलेल्या इंद्राणीवर पोटच्या मुलीची शीना बोराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचा आरोप आहे.

इंद्राणीला जे. जे. रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. दोन महिन्यात दुसऱ्यांदा इंद्राणीला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात त्या रुग्णालयात होत्या. त्यावेळी तिच्यावर वेगवेगळया चाचण्या करण्यात आल्या. डिप्रेशनच्या औषधांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button