breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना मतमोजणीची उत्सुकता कमी, अन् ‘ईव्हीएम’ची चिंता अधिक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उद्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. एरव्ही नागरिकांना निवडणुकीत कोण निवडून येणार आणि कोणाला किती मतदान पडणार याची उत्सुकता लागलेली असायची. मात्र, यावेळी निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता कमी आणि ईव्हीएम हॅकींगची चिंता नागरिकांना सतावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याविषयी कडवट प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये 21 ऑगस्ट रोजी मतदान झाले. उद्या मतमोजणी होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या चेह-यांवर मतमोजणीची उत्सुकता कमी आणि ईव्हीएम हॅकींगचे प्रकार घडण्याची सर्वाधिक चिंता दिसत आहे. एरव्ही सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत मतमोजणीची उत्सुकता लागून रहायची. मात्र, यावेळचे चित्र संशयास्पद असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसू लागल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीविषयी नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर कडवट प्रतिक्रिया

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार आले. पाच वर्षात भाजप सरकारच्या कामाचा आढावा घेतला तर विकास कामांच्या नावाने केवळ आकडेवारीच बाहेर आल्याचे दिसते. प्रत्यक्षात काम मात्र, दिसत नाही. त्यामुळे आता नागरिकांचाही भाजप सरकारवरला विश्वास उडत चालल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, विरोधकांनी सुध्दा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार असल्याचे वातावरण उठविले होते. त्यात आता मोठी भर पडल्याचे दिसते. उद्याच्या मतमोजणीची उत्सुकता लागल्याचे चित्र दिसत नसून ईव्हीएम हॅकींगचा प्रकार घडणार आणि पुन्हा भाजपची सत्ता येणार, अशाच प्रतिक्रिया समाज माध्यमांमध्ये व प्रत्यक्ष बोलताना सुध्दा नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button