breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राजू शेट्टींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं; म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी..

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. देशाचे धोरण ठरवणाऱ्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत देण्याची भावना नाही. सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा असून आजच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राज्यकर्त्यांची झोप उडणार आहे, असं शरद पवार म्हणाले. यावरून स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना शेतीतीतल गुरू मानतात. त्यामुळे आता आपला गुरूच रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे ही निर्यात बंदी मागे घेतली पाहिजे. स्वाभिमानी पक्षाने सुरुवातीपासूनच वाढवलेल्या निर्यात शुल्काला विरोध केला आहे आणि निर्यात बंदीलाही विरोध केला आहे.

हेही वाचा  –  ‘सरकारच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा’; ठाकरे गटाचा गंभीर आरोप 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शेतकरी संकटात असताना मदत करण्याऐवजी भाजप सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. नाशिकची द्राक्षे बांगलादेशात जातात. त्या देशाने द्राक्षांवर १६० रुपयांचे आयात शुल्क लागू केले. एवढासा देश आमच्यावर कर बसवतो आणि आमचे सरकार बघत नाही. असेच कर लागू केले गेल्यास शेतकरी वाचू शकणार नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या बंदीमुळे आणखी अडचणी निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button