breaking-newsमहाराष्ट्र

ट्रक आणि एर्टीगा मोटारीचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

बीड (महा-ई-न्यूज) – जामखेडवरून आष्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक आणि एर्टींगा कारची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये कारमधील चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. आष्टीच्या पाखरी शिवारातील ही दुर्दैवी अशी घटना आहे. जामखेडवरून आष्टीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकनं एर्टीगाला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे आणि सात वर्षीय अनिकेत चमकुरे यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नांदेडचे रहिवासी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button