breaking-newsमनोरंजन

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये झळकणार ‘गली बॉय’

बॉलिवूडमध्ये सध्या यशाच्या शिखरावर असलेले दोन कलाकार म्हणजे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट. १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केलं असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे आता हा चित्रपट ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०१९’ मध्ये दाखविला जाणार आहे.

या महोत्सवाचं आयोजन ८ ते १७ ऑगस्ट रोजी मेलबर्नमधील व्हिक्टोरिया येथे करण्यात आलं असून या महोत्सवाचे हे १० वे वर्ष आहे. या निमित्ताने १० ऑगस्ट रोजी जोया ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी एका चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहे.

“भारतीय चित्रपट जेव्हा सीमा पार करुन परदेशामध्ये प्रदर्शित होतात. तेव्हा तो अत्यंत अभिमानास्पद क्षण असतो. एका चित्रपटाची दिग्दर्शिका, निर्माती म्हणून हा माझ्यासाठी प्रचंड आनंदाचा क्षण असून भारतीय चित्रपटांना अन्य देशात प्रदर्शित होणं ही अभिमानाची बाब आहे”, असं म्हणत जोयाने तिचं मत व्यक्त केलं.

पुढे ती म्हणते, “मेलबर्नमध्ये आयएफएफएम २०१९ मध्ये आमंत्रित केल्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. येथे अनेक संस्कृतींचा मेळ होतो. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळेच मी ऑस्ट्रेलियामध्ये ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी चर्चा करण्यास उत्सुक आहे”.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button