breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बंडखोर शितल शिंदे यांची अखेर मागार

  • सभापती पदासाठी भरलेला अर्ज घेतला मागे
  • भाजपच्या वरीष्ठ स्तरावरून वाढला होता दबाव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी भाजपतर्फे नगरसेवक विलास मडिगेरी यांचा अर्ज ऐनवेळी दाखल झाल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजय उर्फ शितल शिंदे यांनी भरलेला अर्ज अखेर मागे घेतला. पक्षातून त्यांच्यावर तिव्र दबाव वाढला होता, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.

स्थायी समिती सभापती पदासाठी शितल शिंदे यांचे नाव सुरूवातीपासूनच चर्चेत होते. मात्र, भाजपकडून विलास मडिगेरी यांनी सभापती पदासाठी अर्ज भरल्याने शिंदे यांचा पत्ता कट झाला होता. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करत अर्ज भरला होता. त्याला राष्ट्रवादी, शिवेसना सदस्यांनी पाठिंबा दिला होता. शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर अर्ज भरलेल्या शिंदे यांना सभापती पदावर निवडून दिल्यास समाजात काय संदेश जाईल. पक्षाची प्रतिमा मातीमोल होईल, या भितीपोटी पक्षश्रेष्ठींनी शिंदे यांच्यावर दबाव आणला होता.

पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून शिंदे यांची मनधरणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला. त्यामुळे सभापती पदासाठी विलास मडिगेरी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. विलास मडिगेरी यांच्या नावाबाबत शितल शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षश्रेष्ठींची नजरचूक झाल्याचे म्हटले होते. परंतु, ती नजरचूक नसून हेतूपुरस्सर घेतलेला निर्णय होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button