breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई – लोकलचे चाक रुळावरून घसरले

लोकलचे चाक रुळावरुन घसरले असल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी झालेले नाहीत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीएसएटी-वांद्रे लोकलच्या पहिल्या डब्याचं चाक किंग्स सर्कल आणि माहिम स्थानकादरम्यान असताना रुळावरुन घसरलं. ११.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील अंधेरी- सीएसटी, अंधेरी-पनवेल वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून पाहणी सुरु केली आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने आज सुट्टी असल्या कारणाने लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी कमी आहे. यामुळे सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झालेले नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button