breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आर्थिक मुद्द्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महासभा घ्या, भाऊसाहेब भोईर यांची महापौरांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना साथीमुळे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महापालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भोईर यांनी पत्रात म्हटले आहे की, करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र दोन महिन्यांच्या कालावधी पेक्ष्या जास्त काळ बंद आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यामुळे जवळ जवळ सर्व अधिकार पुणे जिल्हा कलेक्टर आणि महानगरपालिका आयुक्तांकडे गेलेले आहेत. प्रशासनाकडून करोना साथीसंदर्भात घेतले जाणाऱ्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्यामुळे, आणि शहरातील डॉक्टर, नर्सेस, इतर आरोग्यसेवक, पोलीस प्रशासन पालिका क्षेत्रात करोना साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.

पालिकेची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप झालेली नाही. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून पालिका क्षेत्र जवळ जवळ संपूर्णपणे बंद असल्यामुळे, मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालू नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील संपूर्ण जनता आर्थिक विवंचनेत सापडली आहे. नागरिक पालिकेच्या करसंकलनात सूट मिळावी म्हणून मागणी करत आहेत.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. करोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. त्यातही तांत्रिक कारणांमुळे काही अडथळे निर्माण होत असल्यास, आपण शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. यामुळे सध्या लागू असेलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल आणि पालिकेला येऊ घातलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, असे या पत्रात भोईर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button