breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus:मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असतानाच मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित अधिकारी राहत असलेली चर्चगेट इथली यशोधन इमारत सील करण्यात आली आहे. यशोधन इमारतीत राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी राहतात. यशोधन इमारत सील केल्याने इमारतीत राहत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत.

दुसर्‍या IAS अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधित झाले होते. आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे.

यापूर्वी मंत्रालयातील अधिकारी कोरानाबाधित आढळल्यानंतर दोन दिवस मंत्रालय बंद करण्याची वेळ सरकारवर आली होती, त्यावेळी मंत्रालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

आतापर्यंत मंत्रालयातील २ प्रधान सचिव, एक उपसचिव, २ सफाई कर्मचारी, एक PWD विभागातील कंत्राटी कामगार आणि मंत्रालयात उभ्या असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button