breaking-newsपुणे

आरोग्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर, NIV मध्ये बैठक घेणार

पुणे |महाईन्यूज|

कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लॅब सुरू केल्या जाणार आहेत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (एनआयव्ही) भेट देणार आहेत. त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.

राजेश टोपे म्हणाले, नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही शिखर संस्था आहे. त्यांच्याकडून या चाचण्यांसदर्भात सर्व मार्गदर्शक नियम तयार केले जातात. त्यांच्या संचालकांची मी आज भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लॅब सुरू करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे.

पुणे दौऱ्यामध्ये नायडू रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचाही आपण आढावा घेणार आहोत, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाधितांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत ४२ वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button