breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री आर्या बॅनर्जीची हत्या नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण

मुंबई – सुपरहिट चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये विद्या बालन, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकात्यातील जोधपूर पार्क स्थित घरात आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. तिच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिची हत्या झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून आर्याची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता पोस्टमार्टेनंतर पोलिसांनी खुलासा केला आहे की तिची हत्या झालेली नाही. तसेच तिच्या मृत्यूसाठी कुणी बाहेरचा माणूस जबाबदार नाही. ‘द डर्टी पिक्चर’ सह आर्या बॅनर्जीने दीबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ मध्ये देखील काम केलं होते. आर्या सुप्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.

आर्याच्या मृत्यूसंदर्भात बोलताना कोलकाता पोलिस सहआयुक्त (गुन्हे) मुरलीधर शर्मा यांनी सांगितलं की, आर्याची हत्या झालेली नाही. आर्याचा मृत्यू यकृताच्या सिरोसिसमुळे झाला असावा असा अंदाज आहे.

11 डिसेंबर रोजी अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घर बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच आर्या तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली होती.

पोलिसांनी आर्याचे दोन मोबाईल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी आत्महत्या आहे का या दृष्टिनंही करत आहेत. आर्याच्या मोलकरणीने सांगितलं की, आर्याच्या घरी कुणाचं येणं जाणंही नव्हतं.

कोलकातामध्ये जन्मलेल्या आर्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. आर्याने शास्त्रीय संगीतामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button