breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

प्लॅस्टिक,स्टीलवर 2 ते 3 दिवस सक्रीय राहू शकतात कोरोना विषाणू

कोरोना विषाणूचा मुकाबला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आताच्या परिस्थितीला प्रत्येक छोटी- मोठी माहिती ही महत्त्वाचीच आहे… अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधनादरम्यान आलेल्या अहवालानुसार एक महत्त्वाची माहिती दिली आहे…त्यांनीअस सांगितलं आहे की, कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किंवा हवेत खूप वेळ सक्रिय राहतो,सार्सप्रमाणेच हा विषाणू जास्त काळ मानवी शरीराबाहेर सक्रिय राहतो… तसेच या संशोधनानुसार कोरोना विषाणू हे प्लॅस्टिक आणि स्टीलवर दोन ते तीन दिवस सक्रीय राहू शकतात…

When an infected person touches a surface, like a door handle, there’s a risk they leave viruses stuck there that can live on for two to three days.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शन संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार कोरोना विषाणू हे प्लॅस्टिक आणि स्टीलवर दोन ते तीन दिवस सक्रीय राहू शकतात. त्याचवेळी पुठ्ठ्यावर ते २४ तास सक्रिय राहू शकतात. हवेमध्येही हे विषाणू तीन तास सक्रिय राहू शकतात, असे निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढले आहेत. 

काही शास्त्रज्ञांनी या निष्कर्षांवर टीका केली आहे. हे निष्कर्ष खूप वाढवून सांगण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या कालावधीसाठी कोरोना विषाणू कार्यरत राहात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. खोकला किंवा शिंका यातूनच कोरोना विषाणू हवेत मिसळतात. त्यानंतर ते खूप कमी वेळ हवेत सक्रिय राहू शकतात, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button