breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गावर पीएमपी बससेवा सुरु

पिंपरी –  कित्येक वर्षे रेंगाळलेली निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गावर पीएमपी बससेवा आज (शुक्रवारी) सुरु करण्यात आली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून निगडीतून बीआरटी मार्गावर बस धावली. तसेच निगडीच्या बस टर्मिनलसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव देवून त्यांचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.

महापालिकेच्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर शुक्रवारपासून मार्गावर बस सुरु केली आहे.  या मार्गावरुन 273 बस धावणार आहेत. एका दिवसाला 2200 ते 2300 फे-या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. पीएमपीच्या 113 गाड्या, तर भाडेतत्त्वावरील 139 गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील 21 गाड्या अशा एकूण 273 गाड्या या मार्गावर धावतील.

तसेच बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात आली आहे. अन्य वाहनांना परवानगी नाही.  इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. महापालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button