breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांचा अजब कारभार ; सल्लागारांच्या मार्गदर्शनाने रस्त्यांची होणार साफसफाई

मे. टंडन अर्बन सोल्यूशन कंपनीवर आरोग्य कार्यकारी अधिका-यांची मेहरबानी  

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा अजब कारभार पाहावयास मिळू लागला आहे. यापुर्वी स्मशानभूमी, पेव्हींग ब्लाॅक यासारख्या कामांना सल्लागार नियुक्ती झाले आहेत. आता तर शहरात यांत्रिक पध्दतीने रोडस्विपर मशीनद्वारे क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते साफसफाई करण्याच्या कामालाही सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी स्थायीसमोर ठेवलेल्या त्या प्रस्तावाला आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीने मान्यता दिली. 

यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील मोठ्या रस्त्याची साफसफाई रोड स्विपर मशीनद्वारे करण्याची निविदा काढण्यात आली होती. त्या निविदेची मुदतवाढ कालावधी 31 आॅगस्ट 2018 रोजी संपुष्टात आला. तर नवीन निविदा तयार करण्यासाठी पर्यावरण आभियांत्रिकी विभागामार्फत महापालिकेने राज्य, केंद्र अथवा मनपाच्या योजनेर्तंगत विविध नाविन्यपुर्ण प्रकल्प आणि पर्यावरण पुरक प्रकल्प राबविण्यासाठी अनुभवी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्याकरिता तीन तज्ञ सल्लागारांचे पॅनल तयार करण्यात आले.

महापालिका आरोग्य मुख्य कार्यालयातून क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात मोठे रस्ते यांंत्रिक पध्दतीने ( रोड स्विपर मशीन) साफसफाई कामाची निविदा प्रस्तावित करण्यात येणार आहे. शहरातील रस्ते व चार्ज निश्चित करणे, त्यांचा सर्व्हे करणे, आरएफपी तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे आदी कामे करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या सल्लागार पॅनेलवरील अनुभवी मे. टंडन अर्बन सोल्यूशन कंपनी या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली.  या निविदेच्या येणा-या अंदाजे एकूण प्रकल्प खर्चापैकी भांडवली खर्चाचे 0.70 टक्के अथवा प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button