breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘प्रत्युष’च्या अचाट बुद्धिमत्तेची सोमाटणे परिसरात चर्चा

पिंपरी |महाईन्यूज|

दीड वर्षाच्या मुलांना जास्तीत जास्त काय बोलता येऊ शकते, असे म्हटल्यावर कोणीही सहज सांगते काही शब्द तेही बोलायला सोपे असलेले. पण, सोमाटणे येथील अवघा 18 महिन्यांचा प्रत्युष पाटील हा अपवाद ठरला आहे. त्याच्या अचाट बुद्धिमत्तेची सोमाटणे परिसरात चर्चा आहे.

प्रत्युष हा अवघा दीड वर्षाचा आहे. इंग्रजी महिने, अबकड, मराठी-इंग्रजी, सर्व दिशा, रंग, आठवड्याचे वार हे सर्व त्याच्या मुखोद‍्गत आहेत. त्याचे वडील शिरगाव येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आई उच्चशिक्षित असून गृहिणी आहे. तो नऊ महिन्यांचा झाल्यापासून त्याच्यातील विशेष बुद्धिमत्तेचा अनुभव त्याची आई अश्विनी पाटील यांना आला. त्याला पहिल्या वेळेस गायत्री मंत्र म्हणून दाखवला, तर त्याने दुसर्‍या दिवशी हा मंत्र म्हणून दाखवला.

त्याच्यात काहीतरी वेगळे आहे, हे त्यांनी हेरले आणि त्याला पुढील गोष्टीसाठी तयार करायचे ठरविले. तो पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची नावे, काही गाण्यांवरून गायकांची नावे, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, फुले, खेळ, राष्ट्रगीत आणि विशेष म्हणजे ध्वजावरून 48 देशांची नावे ओळखतो. अद्याप त्याला नीटसे स्पष्ट बोलताही येत नाही, तरीही त्याच्याकडे अचाट बुद्धिमता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button